*संस्कृती खोल्लमने अमेरीकन संस्कृतीचे केले आकलन*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील चार्टर्ड अकाउंटंट सुनिल जनार्दन खोल्लम आणि बिट्स कम्प्युटर च्या संचालिका कविता खोल्लम यांची सुकन्या संस्कृती खोल्लम ही रोटरी इंटरनॅशनल च्या रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत अमेरिकेला भेट देऊन भारतात परतली आहे.
तिने तेथील संस्कृतीचे जवळून आकलन केले. संस्कृतीने कॅपिटल सिटी हायस्कूलमध्ये ग्रेड इलेव्हन चे शिक्षण घेतले आणि सायबर सेक्युरिटी, सायकॉलॉजी, फूड्स आणि स्पॅनिश लांग्वेज याविषयी उच्च शिक्षण घेतले जेफरसन सिटी इव्हिनिंग क्लब, रोटरी डिस्ट्रिक्ट 6080 येथील क्लबला भेट देऊन अमेरिकन रोटरी सदस्यांना भारतीय संस्कृती समजावून सांगितली . लिंकन युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी अशा विविध ठिकाणांना तिने भेटी दिल्या.तेथील शिक्षण पध्दतीचा तिने अभ्यास केला.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे आणि तत्कालीन अध्यक्ष राहुल खळदे यांचे मार्गदर्शक तिला लाभले.
राहुल खळदे आणि अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी तिचा गौरव केला.