*आषाढ काव्य महोत्सव कविसंमेलन संपन्न*
लोणावळा :
लोणावळा येथे मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर आषाढ काव्य महोत्सव कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्मृतीशेष केशवराव मारोतकर स्मृती काव्य स्पर्धा पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.राजन लाखे पुणे हे होते.प्रमुख अतिथी सुप्रसिध्द कवयित्री प्रिया बापट,गोवा आणि सतर्क महाराष्ट्र न्यूज चॕनलच्या संपादक रेखा भेगडे पुणे हे होते.कार्यक्रमाचे आयोजन मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजया मारोतकर,सचिव मंगेश बावशे,कोषाध्यक्ष, माधव शोभणे,आणि सर्व पदाधिकारी यांनी केले.स्वागत मंगेश बावसे यांनी केले.सुत्रसंचालन डॉ.माधव शोभणे,मंगेश बावसे,प्रनोती कळमकर,डॉ.राजेश काळे यांनी केले.
यावेळी पाऊस,पावसाची रुपे,शेती,शिवार,शेतक-यांचे प्रश्न आदी विषयावर कवीता सादर झाल्या परीक्षण माधव सटवाणी गोवा,गणेश चव्हाण नागपूर यांनी केले. डॉ.अंजलीताई टाकळीकर,डॉ.साधना तेलरांधे,विजयाताई कडू,मंगलाताई नागरे,शालिनीताई कावरे,डॉ.मोनाली पोफरे,सुशीला कावलकर,संजीवनी काळे,अरुणा कडू आदी कवयित्रींनी सहभाग घेतला.यावेळी प्रिया बापट यांच्या मुंगी उडाली आकाशी आणि आनंद डोह या ललीत लेख संग्रहाचे आणि विजया मारोतकर यांच्या उन्मेष्याचे नवीन वारे या कवीता संग्रहाचे प्रकाशन झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर दुरगुडे सरानी मोलाचे सहकार्य केले.आभार विजया मारोतकर यांनी मानले.