जुना पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत घाटात भीषण अपघात. दोन तरुणांचा मृत्यू,पिकअप चालकावर गुन्हा दाखल

SHARE NOW

कामशेत :

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कामशेत घाटात बुधवार २ जुलै २०२५ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ऋषभ विनोद हिवाळे (वय २३, रा. केशवनगर, बदगाव, ता. मावळ) यांच्या तक्रारीवरून प्रदीप मुकुंदा पाटील (वय ४४, रा. गोकुळनगर, दिघी, पुणे, मूळ रा. पिंपळखुटा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

मृत तरुणांची नावे आकाश जयलाल चौधरी (वय १९, रा. शिवणे, वारजे) व प्रज्वल ज्ञानेश्वर सराफ (वय २३, रा. औंध आयटीआय कॉलेज होस्टेल, मूळ रा. हडपसर, पुणे) अशी आहेत. हे दोघे यामाहा गाडी (MH 12 XB 0038) या दुचाकीवरून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना, कामशेत घाटातील वळणावर पावसामुळे मोटारसायकल स्लीप होऊन डिव्हायडरला धडकली. त्यामुळे हे दोघे रस्त्यावर दुसऱ्या लेनवर पडले. याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअप (MH 14 LB 7628) वाहनाने त्यांना चिरडले. पिकअप चालकाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवून अपघात घडवला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेडगे करत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page