*मावळच्या दोन बाल गायक कलाकारांची स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद रियालिटी शोमध्ये निवड*

SHARE NOW

मावळ :

शनिवार 13 जुलै 2024पासून स्टार प्रवाह वाहिनीवर सादर होणाऱ्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 3 या संगीत स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील दोन कलाकारांची निवड झालेली आहे. अवनी परांजपे (कलापिनी ची बालकलाकार) तळेगाव दाभाडे (पुणे ) आणि स्वरा किंबहुने ( मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गायिका मोनिका काकडे यांची कन्या )कामशेत या दोन बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत. मावळवासी यांचे प्रेम आणि प्रोत्साहन कलाकारांना मिळेल असा विश्वास वाटतो.

*अवनी परांजपे* यांच्या संगिताच्या प्रवासाला सुरुवात कलापिनी कलामंडळामधून सुरुवात केली. कालापिनी च्या बालनाट्य व श्लोक स्पर्धेत गाणाऱ्या मुलींच्या आवाजाने संपूर्ण राज्यातील रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. यातील अवनी ही केवळ 13 वर्षांची असून सध्या पुण्यातील भारती विद्या भवन शाळेत 9 वी मध्ये शिक्षण घेत आहे.

गुरु अंजली कऱ्हाडकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. तिला गायनात किर्तन या गायन शैलीमध्ये प्राविण्य मिळवले. घरातून गायनाला सुरुवात केलेल्या अवनीने अवघ्या 13 व्या वर्षी गुर-शिष्यांना नेदरलँड महाराष्ट्र मंडळ इथे कीर्तन – गायन सादर करायची संधी मिळाली.

Advertisement

*स्वरा अजित किंबहुने*

स्वरा ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. मात्र तिचे आजोळ हे मावळातील कामशेत. तिचे बालपण हे मावळातील कामशेतमध्ये गेले. सध्या ती पिंपरी-चिंचवड येथील रहाटणी येथे राहते आणि एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकते. ती दहा वर्षांची आहे. स्वराचे प्रथम गुरु तिचे आई आणि बाबा, मोनिका काकडे – किंबहुने आणि अजित मुकुंद किंबहुने असून पुढील शिक्षण विदुषी अपूर्वा गोखले (ग्वाल्हेर घराणा) यांच्याकडे मागील 4 वर्षापासून सुरू आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सादर होणाऱ्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 3 या संगीत स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून ती सध्या अंतिम 12 स्पर्धकांमध्ये पोहचली आहे. आषाढी एकादशीनिमित्त स्वराने सादर केलेल्या रखुमाई रखुमाई या गाण्याने परीक्षक व रसिकांना मोहिनी घातली. सध्या तिच्या नाजूक व सुमधूर आवाजाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत आहे.


SHARE NOW

One thought on “*मावळच्या दोन बाल गायक कलाकारांची स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद रियालिटी शोमध्ये निवड*

  • November 29, 2024 at 10:37 am
    Permalink

    Hey there,

    http://www.satarkmaharashtra.in

    I am SEO/Digital Marketing Consultant and I work with 30+experienced IT professionals.

    We can increase targeted traffic to your website so that it appears on Google’s first page. Bing, Yahoo, AOL, etc.

    Do you want to appear on the front page, then?

    Note: I’d love to have a quick chat or call to find out if you are interested to know more about our SEO service and price.

    Kind Regards,
    Deep Arora

    If you don’t want me to contact you again about this, reply with “no thanks”

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page