वादळी पावसात नगरसेवक सागर बोडके यांची तत्पर धाव; तळेगावातील रस्ते काही तासांत मोकळे

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

शुक्रवार दिनांक २२ मे रोजी संध्याकाळी तळेगाव आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागांमध्ये अनेक ठिकाणी मोठी झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यक्षम नगरसेवक सागर बोडके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कटर मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे आणि फांद्या हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

 

अवघ्या काही तासांतच रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. संकटसमयी दाखवलेली तत्परता आणि नागरिकांच्या मदतीसाठी घेतलेली धाव यामुळे नगरसेवक सागर बोडके यांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page