कलापिनी आयोजित नाट्य शिबिराची सांगता प्रेक्षकांनी अनुभवली नृत्य, नाट्य, संगीताच्या अविष्काराची मेजवानी
तळेगाव दाभाडे
कलापिनी सांस्कृतिक केंद्रातर्फे, घेतल्या गेलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह नुकताच पार पडला. अंजलीताई कऱ्हाडकर ह्या सुप्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आणि केंब्रिज विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेतले गेले होते. सांगता समारोहासाठी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक संदीप देवकर आणि स्मृती देवकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराजपूजन, “नमन नटवरा” ह्या नांदीने झाली. शिबिरार्थीनें केलेले आनंद, क्रोध आणि करुणा हे भाव दाखविणारे सांघिक सादरीकरण, नृत्य नाटिका, soundscape, पाडगावकरांच्या कविते वरील प्रहसन, अष्टरसाची म्हणजेच आनंद, करुणा, भय, शृंगार, क्रोध, शांत, वीर, अद्भुत या रसांची एकपात्री झलक, जुने नवे हे जनरेशन गॅप वरचे प्रहसन प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेले. आदित्य देशमुख, मीरा भरड, अशोक सोनाळकर आणि वंदना भारद्वाज या शिबिरार्थीनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त केले. अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक करून कुमारभवन साठी असे उपक्रम सतत घेता येतील हे सुचविले. डॉ . मीनल कुलकर्णी यांनी शिबिराचे महत्व सांगितले. विश्वास देशपांडे यांनी पुढील ५० वर्षात कलापिनीत असेच दर्जेदार कार्यक्रम होत राहतील असा विश्वास व्यक्त केला. संदीप देवकर यांनी एखादी संस्था बहरायला उद्यमशीलता, प्रतिभा व्यवस्थापन आणि उत्तराधिकार नियोजन यांचे महत्त्व सांगितले. अंजली कऱ्हाडकर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की कलापिनीत हेवा वाटण्यासारखे वातावरण आहे. आपण सर्व नाट्य पंढरीचे वारकरी होऊ या. कलापिनीच्या एका छत्राखाली नाटक व्हायला हवे असेही त्या म्हणाल्या. डॉ.अनंत परांजपे यांनी कलापिनीला अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ‘सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राखी भालेराव यांनी शिबिराबाबत माहिती सांगितली.माधुरी ढमाले यांनी सूत्र संचालन केले. स्मिता दिवेकर यांनी आभारप्रदर्शन केले. राखी भालेराव, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, अशोक बकरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिबिरार्थींना प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. शेवटी श्लोकाने समारोहाची सांगता झाली.






