अरविंद एज्युकेशन सोसायटीत वैज्ञानिक संकल्पनेवर प्रयोग सादर करीत विज्ञान दिन साजरा
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित प्रयोग सादर करीत विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रज्ञ सी. व्ही रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मणिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, स्मिता बर्गे, विज्ञान शिक्षिका प्रतिभा ओक, शिल्पा पालकर, तृप्ती जगताप, स्वाती मोरे, उषा साळवे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये हायड्रॉलिक ब्रिज, टाकावूपासून टिकावू अंतर्गत निर्माल्यातील फुले – पाने यांपासून धूपबत्ती, सूर्य ग्रहणाचे विविध प्रकार, दिवस व रात्रीचे चक्र, कार्बन प्युरिफायर, कॅलिडोस्कोप, दुर्बिण, मानवी फुफ्फुसातील अंतररचना व कार्य, एकात्मिक शेती प्रणाली, सांडपाणी शुद्धीकरण यंत्र, मॅग्लेव्ह ट्रेन, भविष्यातील भारत, चांद्रयान-3, सूर्यमाला, लेसर सिक्युरिटी अलार्म, प्रदूषण, टेस्ला काॅईल, साधी यंत्रे, वर्किंग मोडेल ऑफ हार्ट, वर्किंग मोडेल ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, टेलिस्कोप, पेरिस्कोप, मायक्रोस्कोप, पार्टस ऑफ ब्रेन, वॉटर प्युरिफिकेशन, रेस्पिरेटरी सिस्टिम यावर आधारित विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. खास आकर्षण म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे मोठे बनवलेले मॉडेल हे होते. पालकांनी वैज्ञानिक प्रयोगांचे निरीक्षण केले व नवनवीन वैज्ञानिक माहिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली. सेल्फी पॉईंटला सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व समजावून देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःहून नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करून शिकत रहावे. तसेच आपले ज्ञान वृद्धिंगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. प्रतिभा ओक यांनी विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची भीती बाळगू नये, तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिले तर विज्ञान खूप सोपे होते. विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होते हे सांगितले.
विज्ञान शिक्षिका प्रतिभा ओक, शिल्पा पालकर, तृप्ती जगताप, स्वाती मोरे, उषा साळवे यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प बनवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.