*पैसाफंड प्राथमिक शाळेत कब बुलबुल शिबिराचे आयोजन*
तळेगाव : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेत स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चिंतन दिन (२२ फेब्रुवारी २०२४) समारंभाचे औचित्य साधून कब बुलबुल विद्यार्थ्यांचे एकदिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुणे भारत स्काऊट गाईडचे जिल्हा सहाय्यक आयुक्त मा.श्री. विजय जोरी सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सकाळ सत्रात ध्वजारोहण,सर्वधर्मीय प्रार्थनेने शिबिराची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रोप वॉकिंग, मंकी क्रॉलिंग, रोप राइडिंग इ. साहसी प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. सौ पल्लवी जगताप यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार याबाबत तर सौ सुरेखा हांडे यांनी दोरीच्या गाठी व त्यांचे प्रकार याबाबत कृतियुक्त मार्गदर्शन केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव मा.श्री. संतोषजी खांडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
शिदोरीपश्चात शिबिराच्या दुपार सत्रात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. सोनबा गोपाळे गुरुजी,मा.श्री. दामोदर शिंदे, मा. श्री. महेशभाई शहा उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतांतून विद्यार्थ्यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विनायकजी अभ्यंकर यांनी कब बुलबुल पथक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनिता लादे यांनी स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबन, स्वयंशिस्त, सेवाभावी वृत्ती जोपासण्याबाबत तसेच भविष्यात एक चांगला देशसेवक घडण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालवाडी विभाग प्रमुख सौ. मनीषा निऱ्हाळी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शेकोटी कार्यक्रमात विविध खेळ, कृतीयुक्त गीते सादरीकरणातून शिबिराची सांगता झाली. शाळेतील कब बुलबुल पथकाच्या प्रमुख सौ. पल्लवी जगताप समवेत श्री. विठ्ठल दरेकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यातून हा कब बुलबुल मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.