ताल तरंग म्युझिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
तळेगाव दाभाडे:
अखिल भारतीय गांधर्व विद्यालय यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतन येथे संगीत परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये ताल तरंग म्युझिकल अकॅडमी तळेगाव दाभाडेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
संवादिनी वादन( प्रारंभिक परीक्षा) सानवी समाधान क्षीरसागर (विशेष योग्यता श्रेणी)
शुभ्रा प्रशांत सुतार ( प्रथम श्रेणी)तबला वादन (प्रारंभिक परीक्षा)
तेजल उदय देशमुख( विशेष योग्यता श्रेणी)
तबला वादन( प्रवेशिका प्रथम)
कुमार मनन श्रेय टोम्पे( विशेष योग्यता श्रेणी)
तबला वादन( प्रवेशिका पूर्ण)
कुमार पार्थ सुनील पाटील( प्रथम श्रेणी)बासरी वादन( प्रारंभिक)
गजानन वसंत गंधे( प्रथम श्रेणी)
कुमारी वैशाली नंदकुमार हलगेकर( प्रथम श्रेणी)
या सर्वांनी संगीत परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे.
यांना तालतरंग म्युझिकल अकॅडमीचे संगीत शिक्षक समीर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.