लोणावळा नगर परिषदेची धडाकेबाज कर वसुली मोहीम,28 कोटी 70 लाख रुपयांची मोठी वसुली.

लोणावळा :

यंदा लोणावळा नगरपरिषदेने शहरात कर वसुलीसाठी मोहीम करून थकबाकीदार व कर दात्याकडून 28 कोटी 70 लाख रुपयांची वसुली करून कर वसुली धडाकेबाज मोहीम राबवलेली आहे.मार्च महिना हा कर वसुलीसाठी असतो.कर वसुली अखेर कर वसुली होणे गरजेचे असते,त्यामुळे या धडाकेबाज कर वसुली मोहिमेचे थकबाकीदार करदात्यांना चांगलाच जरब बसला आहे.व नियमांचे पालन झाले आहे.नगर परिषदेच्या मालमत्ता करा पोटी38 कोटी 95 लाख 41 हजार रुपये येणे असता मार्च 2024 पर्यंत 28 कोटी 70 लाख रुपये मालमत्ता कर वसुल झाला आहे.

थकीत पाणीपट्टी नऊ कोटी 93 लाख येणे असता मार्च 2024 पर्यंत पाणीपट्टी थकीत वसुली आठ कोटी 92 लाख वसुली झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

ही सर्व कर वसुलीची धडक मोहीम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली अधिकारी  राजेंद्र पांढरपट्टे यांच्या करवसुली पथकाने यशस्वी पार पाडली.

या वसुली पथकाने 21 मालमत्तावर जप्तीची कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

नगरपरिषदेच्या वतीने वारंवार सर्व मिळकतदारांना आवाहन करून नोटीसा पाठविण्यात आल्या. ज्यांनी कराच्या रकमा भरल्या नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या तसेच नळ कनेक्शनही बंद करण्यात आले.याबाबत ज्यांच्यावर जप्तीची कारवाई झाली,व दंडात्मक व्याज टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराची रक्कम त्वरित भरावी असे नगरपालिकेकडून आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page