आईच्या मृतदेहासोबतच चिमुरड्या मुलांनाही फेकले नदीत
तळेगाव दाभाडे :
अनैतील संबंधातून राहिलेला गर्भ खाली करत असताना महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह नदीत टाकत असताना तिच्या दोन मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी महिलेच्या प्रियकराने दोन चिमुरड्या मुलांनाही नदीत फेकून दिले. ही धक्कादायक घटना दिनांक ६ ते ९ जुलै २०२४ दरम्यान तळेगाव एमआयडीसी येथे घडली.
याप्रकरणी महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला मित्रासोबत ठाणे येथे पाठविले. दरम्यान, तेथे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने महिलेचा मृतदेह आणि महिलेच्या दोन्ही मुलांना तळेगाव एमआयडीसी येथे आणले. महिलेचा मृतदेह नदीत फेकून देत असताना महिलेच्या मुलांनी रडून आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी आरोपींनी दोन्ही मुलांना देखील नदीमध्ये फेकून दिले. या घटनेमुळे मावळ परिसतात एकच खळबळ उडाली आहे.