लोणावळा नगरपरिषद,लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंड्स. यांच्या विद्यमाने बस स्टॅन्ड निवारा शेडचे उदघाटन व लोकार्पण.
लोणावळा :
लोणावळा नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंडस यांच्या विद्यमाने लोणावळा ते निगडी,लोणावळा ते खोपोली या लोणावळा शांती चौकापासून(टेलीफोन एक्सचेंज) उपलब्ध असलेल्या बसेस यांच्या प्रवाशांच्या सोईसाठी निवारा शेड उभारून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली.
लोणावळा ते निगडी,व लोनावला ते खोपोली या दोन्ही बसेस सुरू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.लोणावळा निगडी पुढ़े पुण्याकडे जाण्यासाठी योग्य लोकल वेळेत नसल्याने ही बस गच्च भरून जाते तसेच लोणावळा ते खोपोली रेल्वे सेवा नसल्याने येथुन लोणावळा खोपोली बस गच्च भरून जाते या बसेस साठी विविध ठिकाणी थांबे केले पण रस्त्यावर रहदारी वाढल्याने यांचा प्रवाशांना त्रास होऊ लागला अखेर या सर्व गोष्टींचा विचार करून नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंडसच्या विद्यमाने (टेलीफोन एक्स चेंज)शेजारील रस्त्यावरून या बसेस जात आहेत.
रस्त्यावर उन्हाचे पावसाचे बससाठी उभे रहावे लागत असल्याने प्रवाश्यांची गैरसोय आता दूर झाली आणि हे बस स्टैण्ड निवारा शेड उभे राहिले . या बस निवारा स्टैंड उदघाटन मा. प्रांतपाल ला.श्री. दीपक शहा यांच्या हस्ते झाले. तसेच लोणावळा खंडाळा मावळ परिसरातील पर्यटन ठिकानांची माहिती देणाऱ्या फलकांची उदघाटने ही लायन्स पदाधिकारी,मान्यवरांच्या हस्ते केली.
या प्रसंगी उपस्थित लायन्स पदाधिकारी,विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच निगडी,खोपोली बस चालक,वाहक उपस्थित होते .त्यांचाही सम्मान लायन्स प्रेसिडेंट ला.सुरेश गायकवाड व पदाधिकार्यांच्या हस्ते देण्यात आले.या प्रसंगी लोणावळा शहर व परिसरातील पत्रकारांचा सम्मान प्रेसिडेंट ला. सुरेश गायकवाड यानी केला.
या प्रसंगी सुरेखा जाधव(मा.नगराध्यक्ष)श्रीधर पुजारी (मा.उपनगराध्यक्ष) ला. नंदकुमार वाळंज , ला.सुरेश गायकवाड, ला.रमेश लुनावत, ला.अमित अगरवाल, ला. राजेश मेहता,ला. डॉ.हेमंत आगरवाल , ला.विवेक घाणेकर,ला.विजय रसाळ , ला. डॉ.श्रीकांत रावण,संजय गोलपकर,ला.अनिल गायकवाड, ला.गोरख चौधरी,राजेंद्र चौहान,बापू तारे,तीखे,लायन्स महिला पदाधिकारी, ला.सौ.घाणेकर, ला सौ.संध्या खंडेलवाल,ला. डॉ.सौ.सीमा शिंदे,सौ.मेहता, ई. सर्व महिला उपस्थित होत्या .उदघाटन झाल्यावर हॉटेल इनराइस येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.