*श्री गणेश तरूण मंडळ गणपती चौक तळेगांव दाभाडे { मानाचा पाचवा गणपती }*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा दि.१४/०८/२०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध महिला उद्योजक ( Smit केक शाॅपचे संचालिका सौ. सोनालीताई खवरे व सतर्क महाराष्ट्रचे संपादिका सौ. रेखाताई भेगडे हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक प्रमुख वैष्णवी आंबीकर यांनी करून दिला.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते मंडळाचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत मंडळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे शुभम फाकटकर तर अध्यक्षीय मनोगत सौ. राधिका हेरेकर व आभार प्रदर्शन माजी उपाध्यक्ष श्री प्रथमेश प्रदीप भालेराव तर सुत्रसंचालन अवधुत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनिता साले , आर्यन कट्टी ,विश्वेश जायताडे ,आर्यन जायताडे ,श्रेयस मोरे ,समर्थ झोडगे , सायली मेहता , प्रकृती गोरीवाला , जुई कुलकर्णी , सहिल येवले , हिमांशी थांगेय , गायत्री तांबोळी , आर्यन कुलकर्णी , मधुरा हरपुडे , प्रांजल पांचोली , समिरा इनामदार, वर्धन गोयल , प्रणित माळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे आधारस्तंभ श्री दत्तात्रय मेढी यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.

Advertisement

मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.

याही वर्षी *गुरूवार दि. २८.०८.२०२५* रोजी सकाळी ठिक ७ वा. *सामुहिक महिला अर्थवशीर्ष पठण*, ( स्व. कासाबाई भेगडे सभागृह विठ्ठल मंदिर शाळा चौक )

दुपारी २ वा.*भव्य लोकनृत्य स्पर्धा*, ( सुशीला मंगल कार्यालय )

*शनिवार दि. ३०.०८.२०२५*

सकाळी *श्री गणेश याग*

*सोमवार दि. ०१.०९.२०२५*

संध्याकाळी सामुहिक अथर्वशीर्ष पठण

आयोजित करण्यात आले आहे.

तरी इच्छुकांनी आपला सहभाग वरील कुठल्याही कार्यक्रमात नोंदवायचा असल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.

 

संपर्क :-

सांस्कृतिक विभाग :-

श्रीकांत मेढी – ९३७११०५०२२

धार्मिक विभाग :-

केदार मेढी – ९४२३०२१४२४.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page