एस .एम. एस. अँड ई .टी .चे सचिव श्री. किशोर राजस यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा.
तळेगाव दाभाडे.
स्नेहवर्धक मंडळ सोशल एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात आज संस्थेचे सचिव श्री. किशोर राजस यांचा 75 वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात विद्यालयात साजरा करण्यात आला. श्री. किशोर राजस यांच्यावर पुष्पवृष्टी व 75 दिव्यांनी औक्षण करून सोहळ्यात सुरुवात झाली.
संस्थेतर्फे केक कापून ,मानपत्र , पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ, भेटवस्तू देऊन सर्व संस्थेचे मान्यवर सभासद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या .
कार्यालयीन अधीक्षक सौ. सुजाता कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले.संस्था मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष श्री .चंद्रकांत शेटे यांनी विद्यालयाच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान याला उजाळा दिला, श्री .सुरेशभाऊ चौधरी यांनी त्यांच्या 55 वर्षाच्या मैत्रीचा थोडक्यात आढावा सादर केला. संस्थापक डॉ. श्री. ढाकेफळकर ,श्री अशोक काळोखे, श्री. नागुलपिल्ले, श्री. गनिमीया सिकिलकर, मुख्याध्यापिका सौ .नूतन कांबळे, प्राचार्य डॉ. पल्लवी वर्तक यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मनमिळावू, शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष, समाजकार्य सहभागी, प्रेमळ, हसतमुख असे व्यक्तिमत्व विद्यालयाच्या उभारणीसाठी लाभले हे विद्यालयाचे अहोभाग्य असे मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाले.
उत्सव मूर्ती श्री. किशोर राजस यांनी आपल्या मनोगतात विद्यालयात प्रवेश केल्याबरोबर नवचैतन्य निर्माण होते व काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. पुढील आयुष्यात असेच सर्वांचे प्रेम आपणास मिळत राहो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष श्री. गनिमीया सिकिलकर ,खजिनदार श्री. शिवाजीराव आगळे ,संस्थापक डॉ. श्री .ढाकेफळकर, श्री. सुनील कडोलकर, श्री. अशोक काळोखे, श्री. नागुलपिल्ले, श्री.सुभाष खळदे ,श्री. सुरेशभाऊ चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे ,बी.एड कॉलेज प्राचार्य डॉ. पल्लवी वर्तक, ऑफिस कार्यालयीन अधीक्षक सौ. सुजाता कुलकर्णी, सर्व विभाग पर्यवेक्षक श्री. दीपक खटावकर श्री .सागर केंजूर, सौ. वंदना भोळे, अमृता देशमुख सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक खटावकर यांनी तर आभार सौ वंदना भोळे यांनी केले. कार्यक्रमाची सजावट सौ. श्रद्धा क्षीरसागर ,सौ. सोनिया चव्हाण व सहशिक्षक यांनी केले.स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.