*कॉनक्वेस्ट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
पिंपरी चिंचवड :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्न महाराष्ट्र विकास केंद्र संचलित, महाराष्ट्र विकास केंद्राचे,
कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँन्ड कॉम्प्युटर स्टडीज, चिखली
व योगसूत्र इन्स्टिट्यूट ऑफ योगा रिसर्च सेंटर चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित 11वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ दि.21/06/2025 सकाळी 11.30 वाजता महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप कदम यांनी आपल्या मनोगतातून “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या जागतिक थीमची कल्पना भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यावर्षी ‘योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ असे सांगून प्रदीप कदम यांनी दैनंदिन जीवनात योगाचे फायदे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशाल आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. विशाल गुरव उपस्थित होते. त्यांनी योगा दिनाचे औचित्य साधून सुदृढ व निरोगी शरीर राहण्यासाठी दररोज योगा करणे काळाची गरज आहे व जीवनातील योगाचे महत्त्व विषद केले. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष, प्रसिद्ध जलतज्ञ अनिल पाटील यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या.
क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाची द्वितीय वर्ष कला शाखेचची विद्यार्थिनी योगिता बनसोडे हिने विविध प्रकारचे योगासनांचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे योग आसने व प्रात्यक्षिक करून घेतले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी वैभव पताळे, डॉ.अमोल कवडे, प्रा. आण्णासो लावंड, प्रा. मयुरी पाटील, प्रा. आरती पठाडे, प्रा. कोमल वाघ आदी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.सुमित जाधव, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिद्धार्थ डोंगरे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप सोनवणे यांनी आभार मानले.