श्रीक्षेत्र देहू देहूरोड शहर मंडळ भाजपाच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी तक’ प्रदर्शनी
देहूरोड:
दिनांक १८ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र देहू देहूरोड शहर मंडळ भाजपाच्या वतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला अकरा वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या अकरा वर्षात करण्यात आलेल्या विकास कामे ,मोठमोठ्या योजना व महत्त्वाचे निर्णय या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आले
‘संकल्प से सिद्धी तक’ या प्रदर्शनी च्या माध्यमातून विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची 11 वर्षे तसेच देव देश धर्म आणि समाज संस्कृती कार्यासाठी केलेल्या कामांचा जनजागृती आढावा माहिती दिवसभर पालखी सोहळ्या निमित्ताने येणाऱ्या भाविक आणि भक्ताना देण्यात आली.
याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत दादा पाटील प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे,महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप दादा मोरे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र देहू देहूरोड शहर मंडल भाजपाचे अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहसंयोजक मच्छिंद्र परंडवाल यांनी केले. यामध्ये त्यांना सहकार्य तात्या पाचपिंड ,निशांत बाबर ,उमेश शिंदे,सचिन काळोखे ,प्रद्युम्न टिळेकर,सोमाभाऊ शेळके,संदीप टिळेकर, नाना साकोरे,बाळासाहेब शेलार, सविता पिंजन,पल्लवी पिंजन,प्रीती चौधरी,चंदना पांडे यांनी मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत बाबर यांनी केले आभार तात्या पाचपिंड यांनी मानले. तसेच सदर प्रदर्शनीला केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि विमान हवाई उड्डाण मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासह पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.