शिवली येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पंधरा वर्षांनंतर पाखरे पुन्हा एकत्र आली शाळेच्या अंगणी

SHARE NOW

पवनानगर:

शिवली मावळ येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली भडवली येथे माजी विद्यार्थी शाळेतील २०१० ते २०११ इयत्ता दहावी एकाच वर्गात सोबत शिकलेले विद्यार्थी यांनी १५ वर्षांनंतर एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला.

नियोजन अक्षय ठाकर, विकास जगदाळे, अमित घारे,वैशाली बालवडकर,स्वाती आडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पोकळे यांनी केले.

तसेच वैशाली बालवडकर, सुनील लोहर,आदेश आडकर, रामदास ठुले या सर्वानी मनोगत व्यक्त करून कलागुण एकमेकांसोबत व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी मिळून शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून लागेल ती मदत देण्याचे कबूल केले.

Advertisement

आठवणींना उजाळा देऊन केले मार्गदर्शन

शिक्षकवृंद यांनी १५ वर्षापूर्वीच्या खोल खोल आठवणींना उजाळा देऊन नवीन मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव,वैशिष्ट गटकुळ,ईश्वर ढगे,अतिष थोरात, किसन माजरे,जगदाळे सर सर्वांनी मनोगत मांडले. यावेळी सर्व शिक्षकांनी कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. सर्व शिक्षकांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page