*इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*

SHARE NOW

इंदोरी :

Advertisement

इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरासाठी देणगी जमा करण्याचा उपक्रम राबविला. त्यांनी खाऊच्या रकमेतून जमवलेला निधी रु. ४०६२८/_ श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे ट्रस्टचे अध्यक्ष हभप साहेबराव काशीद पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे, विश्वस्त जगन्नाथ नाटक पाटील, विश्वस्त शांताराम कराळे पाटील,विश्वस्त जोपाशेठ पवार, विठ्ठल काळोखे, शिवाजी शेलार, संजय पवार, विठ्ठल ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, शाळेचे प्राचार्य रेवाप्पा शितोळे, पर्यवेक्षिका कमल ढमढेरे, अध्यापक लक्ष्मण मखर शिक्षक प्रतिनिधी स्वाती गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी निर्माण केला. महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांच भव्य दिव्य मंदिर उभारणीचे काम भंडारा डोंगर या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असताना प्रगती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा म्हणून आपल्या खाऊच्या पैशातून साठवलेले पैसे निधीसाठी सुपूर्द केले. यासाठी सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी हा निधी निर्माण केल्याबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश मस्के, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी जि प सदस्य प्रशांत ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच बेबी बैकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. या निधीबद्दल भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण साहेबराव काशीद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांवर असलेल्या संस्काराचे त्यांनी कौतुक केले आणि ट्रस्ट च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page