पैसाफंड प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

पैसाफंड प्राथमिक शाळेत दोन्ही विभागात विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले २८ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा हा दिवस महान वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनिता लादे मॅडम व शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.विठ्ठल दरेकर सर यांच्या हस्ते वैज्ञानिक सी.वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका श्रीम .अनिता लादे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सोप्या शब्दात समजावून सांगितले. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगांचे व आकर्षण मॉडेल चे सादरीकरण केले.

Advertisement

विद्यार्थ्यांनी पाण्याची बचत, सौर ऊर्जा ,ॲसिड प्रभाव ,पावसाचे पाणी साठवन, प्रदूषण नियंत्रण, मानवी शरीर कार्य, प्रकाश संश्लेषण यासारख्या विषयावर सोपे प्रकल्प तयार केले होते. लहानग्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले प्रकल्प समजावून सांगितले यामुळे उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना शेरे मॅडम सौ आशा लबडे मॅडम यांनी केले. शिक्षक मनोगत श्री दरेकर सर सौ.सोनाली तारू यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सौ पल्लवी जगताप सौ ज्योती डुंबरे यांनी मांनले

या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा सर्जनशीलता व विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page