ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात मराठी राजभाषा दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या माजी विद्यार्थिनी मीनलताई कुलकर्णी , विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील मराठी विषयाच्या अध्यापिका सौ नागपुरे मॅडम यांनी मराठी भाषेचा इतिहास, कुसुमाग्रजांविषयी माहिती आपल्या भाषणातून सांगितली. यानंतर विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक पोटे सर व शिक्षक प्रतिनिधी सौ.आवटे मॅडम यांच्या हस्ते पाहुण्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिन व कुसुमाग्रज याबद्दल माहिती सांगून आपली मनोगते व्यक्त केली . तसेच मराठी भाषेचे महत्व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी *’माय मराठी तुझियासाठी* ‘या कवितेचे गायन केले. त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेचा अभिमान व मराठी संस्कृती याविषयीची *’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ‘ही कविता सादर केली. सहावीतील विद्यार्थिनींनी मातृभूमीलाच आपली कर्मभूमी’ मानणारे नृत्य सादर केले.

Advertisement

मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सरांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगून भाषा संवर्धन व जतन केल्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुण्या *माजी विद्यार्थिनी मीनल ताई कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून पाठांतराची सवय विद्यार्थ्यांना शाळेतूनच लागते साहित्याची गोडी निर्माण होण्याचं काम शाळेतून घडत असते मराठी भाषा जपली पाहिजे पण हे जपण्यासाठी आपण आपली शब्द संपदा वाढवली पाहिजे .पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या शाळेतील गोड आठवणी सांगून वर्गात देखील जाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील तृप्ती सुराशे व गार्गी दडस* या विद्यार्थिनींनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील अध्यापिका नागपुरे मॅडम, काळे मॅडम व धुमाळ मॅडम यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page