“इंदोरीतील प्रगती विद्या मंदिर व काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज तंबाखूमुक्त शाळा म्हणून सन्मानित” “विद्यार्थ्यांचा संकल्प – आरोग्यदायी भविष्य घडविण्याचा संकल्प”

SHARE NOW

इंदोरी:

इंदोरी (ता. मावळ) येथील प्रगती विद्या मंदिर व ह. भ. प. आ. ना. काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज येथे तंबाखूमुक्त शाळा अभियान प्राचार्य महादेव ढाकणे व पर्यवेक्षक काकासाहेब भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात राबविण्यात आले.

या उपक्रमात विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ अध्यापक लक्ष्मण मखर यांनी तंबाखू व धूम्रपानामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगत आरोग्यदायी जीवन जगण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी इंदोरी गावात प्रभातफेरी काढून घोषणाबाजीद्वारे जनजागृती केली. तसेच सौ. मंगल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याशिवाय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Advertisement

प्राचार्य महादेव ढाकणे यांनी शाळेच्या परिसरापासून १०० यार्डाच्या आत असलेल्या दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ न ठेवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल सरपंच शशिकांत शिंदे व ग्रामपंचायत अधिकारी अरुण हूलगे यांनी शाळेचे कौतुक करत सहकार्याचे आश्वासन दिले.

या अभियानामुळे शाळेने सर्व ९ निकष पूर्ण करून ‘तंबाखूमुक्त शाळा’ प्रमाणपत्र मिळवले. यासाठी पालक, संस्थेचे सचिव संतोषशेठ खांडगे व शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी शाळेचे अभिनंदन केले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. यात अमोल जाधव, अरविंद नाईकरे, संतोष कदम, प्रदीप ढोंगे, सुमती शिंदे, रुपेश शिंदे, श्वेता मोहिते, शैला गायकवाड, विजय साळूंखे, दिपक डांगले, प्रविण राऊत, शोभा निंबळे, वरुण दंडेल, शुभम कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी आणि तंबाखूमुक्त भविष्याचा पाया घालणारा ठरला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page