मुळेश्वर मंदिरात मा. मिलिंद वाळंज यांच्या हस्ते रुद्राभिषेक
आंबवणे :

आंबवणे ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात मुळा नदीचे उगमस्थान श्री क्षेत्र देवघर गावात भगवान शिव शंकराचे जागृत श्री मुळेश्वर देवस्थान आहे.
श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार निमित्त मिलिंद दादा वाळंज मित्र परिवार यांनी मंदिरात रुद्राभिषेक महापूजेचे मा. मिलिंद वाळंज व सौं. शालिनी वाळंज यांच्या शुभ हस्ते आयोजन केले.
कॅनरी रिसॉर्ट व कॅनरी आयरल्यांड चे मालक मा. मिलिंद दादा वाळंज यांना नुकतेच दोन वेळा उद्योगरत्न पुरस्कार मिळाले. त्यामुळे देवघर व परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने एकत्र येऊन मा. मिलिंद दादा यांचा सन्मान केला. तसेच उपसरपंच निलेश मेंगडे, ग्रामपंचायत सदस्या मेघाताई नेवासकर,पो पाटील गणेश दळवी, सा. कार्यकर्ते सचिन चव्हाण यांचा देवघर ग्रामस्थांनी सत्कार केला. बहुसंख्य कार्यकर्ते महा अभिषेक प्रसंगी उपस्थित होते.






