नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या विद्यालयास मावळ तालुक्यातून ‘आदर्श शाळा पुरस्कार’
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या विद्यालयास मावळ तालुक्यातून आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांचे ३ रे वार्षिक अधिवेशन व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक- १/१०/२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता अवसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा -पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात *मा.श्री.दिलीप वळसे* पाटील साहेब(सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष*श्री . अनिल तात्या मेहेर,( संस्थाचालक शिक्षण मंडळ उपाध्यक्ष) मा .श्री .विजय कोलते,*(अध्यक्ष संस्थाचालक शिक्षण मंडळ) संस्थाचालक शिक्षण महामंडळाचे विभागीय अध्यक्ष *मा.श्री.गणपत बालवडकर विभागीय अध्यक्ष)मा.श्री. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी) तसेच संयोजक मा.श्री.प्रदीप वळसे पाटील.आदि मान्यवर उपस्थित होते.संस्थाचालक शिक्षण मंडळ ग्रामीण पुणे यांच्यावतीनेआदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला . ग्रामीण भागातून तालुक्यातील १६ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. यात मावळ तालुक्यातील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मावळ तालुक्यात हे विद्यालय उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. समाज सामाजिक संस्था व औद्योगिक संस्थांच्या मदतीतून हे विद्यालय उभे राहिले आहे.निकालाचीउत्कृष्ट परंपरा भौतिक सुविधा गुणवत्ता आणि समाज प्रबोधनांमध्ये हे विद्यालय अग्रेसर आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यावेळी उपस्थितामध्ये नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सहसचिव मा. श्री नंदकुमार शेलार* तसेच *मा.श्री.दामोदर शिंदे .श्री. सोनबा गोपाळे गुरुजी* तसेच शालेय समितीचे अध्यक्ष *मा.श्री.महेशभाई शहा* तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका *सौ. वासंती काळोखे** व पर्यवेक्षक *श्री. शरद जांभळे* आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष *मा. श्री. बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री)* उपाध्यक्ष *मा. श्री गणेश खांडगे* उपाध्यक्ष *मा. *मा.श्री संतोष खांडगे सचिव.सहसचिव *मा. श्री नंदकुमारशेलार* व खजिनदार *मा. श्री राजेश म्हस्के* या सर्वांनी शाळा वं शाळेचे शिक्षक यांचे अभिनंदन केले. व आनंद व्यक्त करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.