संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ( ग्रामीण ) यांच्यामार्फत आदर्श शाळा पुरस्कार म्हणून ॲड.पु.वा .परांजपे विद्या मंदिराच्या यशात मानाचा तुरा
तळेगाव दाभाडे :
ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे हे मावळ तालुक्यात उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करत आहे. विद्यालयाला ज्ञानदानाचे कार्य करत असताना 78 वर्षे पूर्ण झालेली आहेत. नू.म.वि.प्र. मंडळ संस्था,समाज, सामाजिक संस्था व औद्योगिक संस्थांच्या मदतीतून एक उत्कृष्ट भौतिक सोयी सुविधांनी युक्त असे आदर्श विद्यामंदिर उभे राहिलेले आहे. शाळेच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा,भौतिक सुविधा , गुणवत्ता ,शाळा मूल्यांकनामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक,संपूर्ण शाळा सौर ऊर्जा प्रकल्प खाली,सुसज्ज संगणक कक्ष,अत्याधुनिक प्रयोगशाळा,सुसज्ज ग्रंथालय,शिस्यावृती ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,संपूर्ण शाळा सीसीटीव्ही खाली ,समाजप्रबोधनांमध्ये शाळा अग्रेसर आहे. दहावीच्या निकालाची असणारी परंपरा तसेच क्रीडा विभागातील असणाऱे यश या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्या शाळेला नामदार दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सुविद्य पत्नी सौ. किरणताई दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष श्री.विजय कोलते, उपाध्यक्ष श्री.अनिल तात्या मेहेर ,उपाध्यक्ष श्री.सतीश खोमणे ,उपाध्यक्ष ॲड्वोकेट देवेंद्र बुट्टे पाटील ,खजिनदार श्री. प्रकाश बोरा, सचिव श्री.शिवाजी घोगरे ,सहसचिव श्री.महेश ढमढेरे,विवेक वळसे यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. आदर्श शाळा पुरस्कार समारंभ वितरण प्रसंगी नु.म.वि.प्र.मंडळाचे सहसचिव,शालेय समितीचे अध्यक्ष श्री नंदकुमार शेलार साहेब, संचालक श्री. दामोदर शिंदे साहेब, संचालक श्री.महेश भाई शहा, ज्येष्ठ संचालक श्री.सोनबा गोपाळे गुरुजी शिक्षकांसमवेत आवर्जून उपस्थित होते.विद्यालयाला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका सौ रेखा भेगडे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. संजय तथा बाळा भेगडे ,उपाध्यक्ष मा.श्री. गणेश खांडगे, उपक्रमशील सचिव मा.श्री. संतोष खांडगे ,खजिनदार मा.श्री.राजेश म्हस्के सहसचिव व शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार शेलार,सदस्य श्री.सोनबा गोपाळे गुरुजी, श्री.महेश भाई शहा,श्री. दामोदर शिंदे व सर्व संचालक मंडळ यांनी शाळेचे कौतुक व अभिनंदन केले.