राजेश आवळे यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार प्रधान

SHARE NOW

आळंदी :

Advertisement

आळंदी येथील राज म्युझिक अँड डान्स क्लासेस चे संस्थापक अध्यक्ष राजेश आवळे, संचालिका प्रिया आवळे यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योग जगतातील प्रमुख अभिनेते मान्यवर उपस्थित होते. राजेश आवळे व प्रिया आवळे यांना हा पुरस्कार उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान, त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा, भविष्यातील कलाकार घडवण्याची असलेली जिद्द, विद्यार्थी कलाकारांसाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याची धडपड, शहरी व ग्रामीण भागातील कलाकार मुला मुलींसाठी नवनवीन शाखांची निर्मिती करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याची धारणा, भारतीय प्राचीन नृत्याची संस्कृती कशी जपावी याविषयी असणारी तळमळ तसेच समाजा विषयी असणारी सामाजिक बांधिलकी अशा निविदांगी उल्लेखनीय लक्षवेधी तसेच समाजोपयोगी कामगिरीची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे निलेश साबे यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page