“शिवचरित्र पारायण सोहळा यशस्वीरित्या संपन्न…”
तळेगाव दाभाडे :
शिवशाही परिवार तर्फे मागील पाच वर्षे अखंडित होत असलेल्या या सोहळ्यात गावोगावी शेकडो मंडळींनी उपस्थिती नोंदवून शिवचरित्र ग्रहण केले. नवलाख उंब्रे, आंबी, आढले व तळेगाव दाभाडे गावांत रोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत शिवचरित्र पारायण मोठ्या जल्लोषात पार पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरांत देव राहिले, धर्म, अध्यात्म, पोथीपुराण, संस्कृती, परंपरा सर्व काही त्यांच्यामुळेच शिल्लक राहिले. नवरात्रोत्सवात देवीच्या उत्सवाचा जागर करित असतांना भारतमातेची सेवा म्हणून शिवाजी महाराजांचे चरित्र शिवशाही दुर्गाभ्यास परिवार तर्फे पारायणरुपी मागील पाच वर्षे गावोगावी घेण्यात येत आहे.
श्रीमंत शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित “राजा शिवछत्रपती पूर्वार्ध व उत्तरार्ध” असे जन्म ते राज्याभिषेक पद्धतीने वाचन व तद्नंतर प्रबोधन आणी अखेरीस शिवप्रभूंची आरती होऊन रोज कार्यक्रम संपन्न झाला.
समारोप प्रसंगी चरित्र कथनाच्या नंतर इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी शिवचरित्रावर आधारित प्रबोधन करतांना, “आज आपल्याला यातून काय शिकायचे आणी आपला वर्तमानकाळ आणी भविष्यकाळ कसा समृद्ध करायचा तसेंच शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहास प्रेमी तथा सर्व श्रोते, वाचक व व्याख्याते मंडळींनी दैनंदिन आयुष्यातील व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून बहुसंख्येने आपल्या मुलाबाळासहित राष्ट्रमंत्र असलेले शिवचरित्र ऐकले पाहिजे. नवी पिढी सक्षम, निर्व्यसनी आणी कर्तृत्ववान घडविण्यासाठी शिवचरित्र हा एकमेव पर्याय आहे. नव्हे नव्हे शिवाजी ही तीन अक्षरे राष्ट्राचा तारकमंत्रच आहे…” असे सांगितले.
तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती स्थानिक जेष्ठ ग्रामस्थ व माता भगिनींच्या हस्ते रोज घेतली गेली. शिवशाही दुर्गाभ्यास परिवारच्या संस्थापिका डॉ. प्रिया बोराडे यांनी गावोगावी पारायण झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना, “शिवशाही परिवार हजारो मंडळींचा झाला असून सर्वांनी मिळून आजवर शेकडो दुर्गाभ्यास सहली सुखरूप आणी सुरक्षित पार पाडल्या आहेत. येत्या 20 ऑक्टोबर 2024 रोजी 100 वी दुर्गाभ्यास सहल राजधानी रायगड प्रदक्षिणा आहे त्यास भक्तिभावाने मनोभावे ही अभ्यास सहल पार पडणार असून बहुतांश मंडळींनी त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आहे…” असे सांगितले.