*माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा* रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत पुन्हा भरला २००३-२००४ च्या बॅच चा १० वी चा वर्ग

*माजी विद्यार्थ्यांनी दिला

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील सन २००३-२००४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. सुमारे वीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तत्कालीन दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांचा सत्कार केला. वीस वर्षानंतर पुन्हा शाळेत आल्यावर शिक्षकांनी लावलेल्या शिस्त आणि संस्कारामुळे सर्वजण चांगल्या पदावर कार्यरत आहेत, कुटुंबात समाधानी आहेत. काही विद्यार्थ्यांनी शिक्षक, मेडिकल, इंजिनीअरिंग, बांधकाम, आयटी, हॉटेल, बँकिंग, संप्रदाय तसेच प्रगतशील शेतकरी म्हणूण आपले जीवन शिक्षकांच्या माध्यमतुन पूर्णत्वास नेलेले आहे, अशी भावना अनेक विध्यार्थ्यानी व्यक्त केल्या. जे शिक्षक व विद्यार्थी सोडून गेले त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सर्व क्षेत्रात हि बॅच अग्रेसर आहे. समाज व शाळा आपल्याकडे भारताचे सुजाण नागरिक म्हणून आशेने पाहत आहे, ज्या वेळेस शाळॆची आठवण येईल त्यावेळेस शाळेत या व शाळेला मदत करा असे आवाहन शिक्षकांनी केले.

Advertisement

याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला स्पिकर सेट, प्रिंटर, मॉनिटर व इतर भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळेस शाळेचे मुखयाध्यापक शरद इस्कांडे, प्रतिभा चौधरी, शंकर कुचीक, स्नेहलता बाळसराफ, सुनीता साखवळकर, भारती धोत्रे, बाजीराव सुपे, सुवर्णा गायकवाड, रुचिरा बासरकर, संजीव जाधव, जयस्वाल सर आदींसह इतर शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिक गिरमे, सुजाता दौंडे, स्वप्नील ढेरंगे, डॉ दीपिका मावळे, डॉ अक्षय पवार, नयनीश कुचेकर, तुषार मराठे, समीर दाभाडे, दिलीप दाभाडे, मनोज भोसले, मनीषा नलावडे, श्वेता काशीद, शिरीष गटकुळ आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

अभिषेक धोंगडे व कुणाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दीप्ती दाभाडे यांनी मानले. अमित दाभाडे, विराज खळदे, धनश्री कुलकर्णी, किरण पापळ, मंदार पारखी, सागर दाभाडे, शिरीष डहाळे, नकुल तेली, नवनाथ वाजे, तानाजी शेलार, अभिजित मावळे, ऋषिकेश भोंडवे आदींनी संयोजन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page