रक्तदान शिबिराचे आयोजन
तळेगाव दाभाडे: शहरातील विक्रांत मित्र मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते कै सागर आत्माराम शेडगे यांच्या स्मरणार्थ व पुना सिराॅलाॅजिकल इंस्टिट्यूट ब्लड बँक पुणे. यांच्या विशेष सहकार्याने गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९: वाजता तळेगाव दाभाडे येथील राजवाडा जवळील विक्रांत मित्र मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचा उद्देश हा रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा करणे तसेच गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे. समाजात रक्तदानाविषयी जागरूकता वाढवणे असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





