जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त, तळेगाव दाभाडे येथील माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे येथे स्तनपान या विषयावर ‘अमृतपान’ या कार्यशाळेचे आयोजन
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथे १ ऑगस्ट २०२५ रोजी स्तनपान या विषयावर ‘अमृतपान’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मावळ विभागातील २५० हून अधिक आरोग्यसेवा व्यावसायिक उपस्थित होते, ज्यात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका , उपसेवीका, आशा सेविका यांचा समावेश होता. संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा नागरे व डॉ विरेंद्र घैसास यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले .
कार्यशाळेचा उद्देश स्तनपानाच्या पद्धतींचा प्रचार व समर्थन करणे तसेच स्तनपानाशी संबंधित गैरसमज दूर करणे हा होता . गेले पाच वर्षे संस्था हा उपक्रम राबवत आहे .कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध स्तनपान सल्लागार डॉ. मंगल वाणी यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ डॉ प्रमिला मेनन होत्या. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संध्या कुलकर्णी आणि उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गायकवाड यांचीही उपस्थिती होती.
ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ उमा वानखेडे, डॉ. शिल्पा क्षीरसागर, डॉ रेणुका पारवे आणि डॉ. चारुलता बापये यांच्यासह, स्तनपान सल्लागार श्रीमती अमृता देसाई यांनी यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. पूर्ण 8 दिवस नागरिकांच्या माहितीसाठी विविध कार्यक्रम करून स्तनपानसप्ताह साजरा होणार आहे.
प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली कोरडे यांनी पाच वर्षांपूर्वी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ सुषमा शर्मा , डॉ जितेंद्र माने यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. मीनाक्षी सुर्वे यांनी इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने सचिव म्हणून काम केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले.






