सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

तळेगाव दाभाडे शहरातील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ व श्री डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषिपंचमी च्या दिवशी गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगावातील शाळा चौक येथील स्वर्गवासी कासाबाई भेगडे(पाटील) सभागृहात अथर्व शीर्ष पठण होणार असून प्रत्येक सहभागी महिला भगिनींना एक आकर्षक भेटवस्तू आयोजकांकडून देण्यात येणार आहे. या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे यंदाचे १२वे वर्ष असून. जास्तीत जास्त महिला भगिनींनी या सामूहिक अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पतसंस्थेचे आधारस्तंभ संतोष छबुराव भेगडे. पतसंस्थेचे अध्यक्ष शरद बबनराव भोंगाडे. गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्ष सौ राधिका चव्हाण.हेरेकर यांनी केले आहे .अधिक माहिती करता सौ संध्या देसाई.९०२८०९०९०७.सौ रूपाली खंडागळे ९१४६०६२४५७ यांच्याशी संपर्क साधावा.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page