*तळेगावमध्ये अथर्वशीर्ष पठण उत्साहात* गणेशोत्सवानिमित्त उपक्रम: परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी

SHARE NOW

*तळेगाव दाभाडे* : ‘ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव

प्रत्यक्षं तत्वमसि’ असे म्हणत

दोन हजाराहून अधिक महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठण केले.शाळा चौक येथील स्व. कासाबाई भेगडे (पाटील) सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि मानाच्या पाचव्या श्री गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने

ऋषिपंचमीनिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष ,विद्यमान संचालक,

पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, पीएमआरडीचे सदस्य, माजी नगरसेवक, पतसंस्थेचे

आधारस्तंभ संतोष भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.

या सोहळ्यास पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष समीर भेगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर वाजे, सल्लागार विलास भेगडे, गुलाब भेगडे, संध्या देसाई,

सरव्यवस्थापक अनिल भोमे, व्यवस्थापिका तस्लिम सिकिलकर, मंडळाच्या अध्यक्षा

डॉ. राधिका हेरेकर, उपाध्यक्ष सिद्धी जाधव, प्रशांत खेडेकर, सल्लागार दत्तात्रय मेढी , श्रीकांत मेढी,अनिल फाकटकर, राहुल हेरेकर, प्रदीप कदम

मुक्ता भावसार, वैष्णवी अंबीकर,

Advertisement

यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.समीर भेगडे ,

प्रतीक्षा भेगडे , राहुल हेरेकर, डॉ . राधिका हेरेकर यांनी अभिषेक केला.

पतसंस्थेच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे,

श्रीकांत मेढी यांनी सहभागी महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शरद भोंगाडे आणि राहुल पारगे यांनी पतसंस्था राबवित असलेल्या उपक्रमांची आणि महिला सन्मान ठेव योजनेची माहिती दिली.

अनिल फाकटकर यांनी मंडळ राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

दरम्यान, पतसंस्था आणि ओम समर्थ मित्र मंडळ कामशेत, श्री संत तुकाराम महाराज तरुण मंडळ देहुगाव, सखी महिला ग्रामसंघ सोमाटणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपन्न झाले. सर्व ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पतसंस्थेच्या वतीने

प्रत्येक सहभागी महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू

देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ,

सल्लागार, दैनंदिन बचत प्रतिनिधी आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page