*तळेगावातील गणेशउत्सव पावसाने आणि भक्तिरसाने चिंब*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव स्टेशन भागातील गणेश उत्सव पावसाने आणि मक्तिरसाने चिंब झालेला आहे.नागरिक बाप्पाचे दर्शन आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत परंतु अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्यामुळे गणेश उत्सवाचा मनमुराद आनंद घेता येत नाही.परिसरात सुशोभिकरण आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट झालेला आहे.सर्वत्र आरत्या होत असून भक्तिमय वातावरण झालेले आहे.स्टेशन भागातील मानाचा पहिला गणपती जागृती मित्रमंडळाचा असून तेथे २०००लाडूचे वाटप करण्यात येणार आहे.विरचक्र मित्रमंडळाने हवामहल आणि स्थिर विद्युत रोषणाई केलेली आहे.शिवशक्ती मित्र मंडळाने श्रीरामाची भव्य प्रतिमा उभारली आहे.इंद्रायणी मित्र मंडळाने हाडाची घनता तपासणी शिबिर आयोजित केले आहे.स्वप्ननगरी येथे शीर्षपठण आयोजित केले होते.जनसेवा मित्रमंडळाने पैठणीचा खेळ आयोजित केला आहे.श्री साईनाथ तरुण मंडळाने केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे.मंगलमूर्ती मित्र मंडळाने म्युझीक लाइट साकारली आहे.अमरहिंद मित्रमंडळाने फुलांची सजावट केलेली आहे.तसेच एकता मित्रमंडळ,फलकेवाडी मित्रमंडळ,अमरदीप मित्रमंडळ,वीज कर्मचारी मित्रमंडळ,जाणता राजा प्रतिष्ठान,आदी ठिकाणी उत्सव साजरा होत आहे






