आमदार सुनील शेळके फाऊंडेशन व उद्योजक संग्राम जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ
तळेगाव दाभाडे:
आमदार सुनील शेळके फाउंडेशन व उद्योजक संग्राम जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने माझं गाव माझी जबाबदारी अभियानाच्या अंतर्गत शनिवार दिनांक २१जुन २०२५ रोजी सकाळी १०ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तळेगाव दाभाडे शहरातील नागरिक बंधू-भगिनींसाठी मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ होणार असून तळेगाव स्टेशन येथील नाना भालेराव कॉलनी मध्ये असणाऱ्या हॉटेल ड्रीम लंच होम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवीन मतदान कार्ड काढणे. दुरुस्ती व ट्रान्सफर. आयुष्यमान भारत(५ लाख रुपये विमा फ्रि) योजना कार्ड. रेशन कार्ड केवायसी. श्रम कार्ड.आदी सुविधा मोफत प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे. आधार कार्ड. लाईट बिल. रेशन कार्ड. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर स्वतःचा मोबाईल नंबर व लाभार्थी व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. सिने अभिनेते मोहन खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. तरी या मोफत शासनमान्य योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संग्राम जगताप मित्रपरिवार व हरी ओम ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३८००२६३०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.