*नानोली येथे दगडाने ठेचून केला मेव्हण्याचा खून*
मावळ :
एमआयडीसी नानोली फाटा येथे आयआयटी कॉलेज परिसरात एकाचा डोक्यात आणि चेह-यावर मोठा दगड मारुन ठेचून खून करण्यात आला.ही घटना सोमवारी(दि.२३)१०.३०वा.सुमारास उघडकीस आली.प्रमोद कुमार जगन सादा(वय-२२)याने त्याचा जिजा अभिनंदन निरो सादा याचा खून केला अभिनंदन हा सतत दारु पिऊन त्रास देतो शिवीगाळ करतो भांडण तंटा करुन मारहाण करतो दारु पिण्याच्या पैशावरुन झालेल्या वादाच्या कारणांनी चिडून जाऊन अभिनंदन निरो सादा वय-२९ सध्या रा.सोम प्रोजेक्ट आयआयटी कॉलेज कामगार वसाहत नानोली ता.मावळ जि.पुणे मूळ रा.बातुटोला साहुगड मधेपुरा राज्य-बिहार याच्या डोक्यात आणि चेह-यावर मोठा दगड मारुन ठेचून गंभीर दुखापत करुन खून केला आहे. प्रमोद कुमार जगन सादा (वय-२२)सो प्रोजेक्ट आयआयटी कॉलेज कामगार वसाहत नानोली ता.मावळ जि.पुणे मूळ रा.खोपेती मधेपुरा राज्य-बिहार याने केला आहे.या बाबतची फिर्याद सोमवारी (दि.२३)केशव गेनू घोटकर(वय-३४) एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी दिली. अशी माहीती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिली.पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.