नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये ‘जागतिक योग दिन’ साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी मध्ये २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला गेला. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे, म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करतात.

विद्यार्थ्यांना नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांनी योगाचे महत्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक तसेच योग शिक्षिका सिमा महाळूंगकर यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके घेतली. इंदिरा महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. अमोल गोरे सर आणि प्रा. संदिप गोरे यांनी प्राणायामाचे महत्व व त्याचा शरीरास होणारा लाभ सांगितला. प्रज्वल रामसे या विद्यार्थ्याने प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने योगासने केली. तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी रोज योगा करण्याचा संकल्प केला.

Advertisement

याप्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी समितीचे चेअरमन तसेच संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, डॉ. अपर्णा पांडे, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, विविध विभाग प्रमुख व विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सिमा महाळूंगकर यांनी केले, डॉ. रेणुका काजळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय , सकाळ यिन क्लब व नवीन समर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम पार पडला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page