*सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे सचिव दत्तात्रय नाटक, अरुण भेगडे,राहुल गोळे, संतोष भेगडे, विजय गरुड, रामराव जगदाळे हे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि स्वागताने सत्कार समारंभाची सुरुवात झाली. प्रथम क्र.कु.सानिका आवटे ९६. २०% द्वितीय क्र. स्वरूप ओव्हाळ ९२%, तृतीय क्र.कु. साहिल गुजर ९०% या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या माध्यमिक विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. प्रसंगी आधारस्तंभ शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा देखील सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या.