शौर्य, बलिदान आणि समर्पणाचा इतिहास विसरता कामा नये – डॉ. प्रमोद बोराडे किल्ले लोहगड येथे ‘किल्ले संवर्धन’ विषयावर एकदिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळा संपन्न
तळेगाव दाभाडे :
“इतिहासाला उजाळा देण्यासाठी किल्ले संवर्धनाची अत्यंत गरज आहे पवन मावळ नाणे मावळ आमदार मावळचा इतिहास जगातील पर्यटकांना खुणावत आहे विजापूर येथे त्रिरत्न बौद्ध काळातील सापडतात तसेच अनेक शिलालेख ही मावळ परिसरात सापडल्याच्या नोंदी आढळतात. आपण सर्वांनीच आपला शौर्य, बलिदान आणि समर्पणाचा इतिहास विसरता कामा नये,” असे प्रतिपादन इतिहास संशोधक अभ्यासक डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी केले ते काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने ऐतिहासिक स्थळे दत्तक योजनेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा किल्ले संवर्धन नुकतीच किल्ले लोहगड येथे पार पडली त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जी एस मोझे कॉलेज पुणे येथील प्राध्यापक आणि इतिहासाचे अभ्यासक डॉ. कदीर शेख, प्रा. हनुमंत पिसे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश देवढे, प्रा. प्रियंका रोकडे, डॉ. मधुकर देशमुख, डॉ. कृष्णा मिटकर, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सचिन चंदनशिवे, प्रा. पृथ्वीराज नरुटे, प्रा. श्वेता खांदवे, शैला ढोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कदिर शेख म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय पूर्णत्वात जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले प्रेम समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन इतिहास अभ्यासता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम शास्त्र, किल्ले प्रशासन वाखण्याजोगे आणि अभ्यास करण्यासारखे आहे, हे करणे म्हणजेच खरे किल्ले संवर्धन करणे आहे. विद्यार्थ्यांनी इतरांना किल्ल्यांचे विद्रोपीकरण थांबवले पाहिजे तसेच किल्ले संवर्धन कार्यात हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.”
पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, “महाराष्ट्र धर्माचे खरं गाणं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्याला आपण जपलं पाहिजे. पूर्व गौरवाचा इतिहास ही आमची जमेची बाजू आहे. त्याच्या पायवाटेने आपण इतिहासावर मुकुट चढवला पाहिजे. लोहगड जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आल्याने त्याच्या संवर्धनाची विशेष जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.”
वन्यजीव मावळ रक्षक संस्थेचे अध्यक्ष निलेश गारडे यांनी गड संवर्धनाच्या आणि लोहगडावरील विशेष नोंदीचे उल्लेख करत इतिहास आणि किल्ले कोणत्या नजरेतून पहावे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर देशमुख यांनी विशेष बाब म्हणून प्रा. डॉ. सुरेश देवढे आणि प्रा. प्रियंका रोकडे यांनी इंद्रायणी महाविद्याल राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेतलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल असे मत व्यक्त करत डॉ. बोराडे आणि डॉ. कदीर शेख यांनी शौर्य, पराक्रमाचा सांगितलेला इतिहास विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्याचे गड किल्ल्यांच्या नियमित संवर्धनाचा वारसा जपावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका डॉ. सुरेश देवढे यांनी विशद केली. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी तर आभार डॉ. कृष्णा मिटकर यांचे मानले.






