दादा दादी पार्कमध्ये जेष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा. ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा ३३वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

येथील दादा-दादी पार्कमध्ये जेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या मेळाव्यासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे( पाटील ).भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अशोक काळोखे, साप्ताहिक अंबरचे संपादक व जेष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, नगरसेवक सुदाम शेळके, पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील .पत्रकार गणेश भेगडे.यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे डाॅ शाळीग्राम भंडारी.आशाताई जैन. श्रीमती स्नेहल रानडे. विठ्ठलराव कांबळे. सुधाकर रेम्बोटकर. सुमतीलाल शहा . विश्वनाथ काळोखे. बाळासाहेब भेगडे . नारायण हेंद्रे तसेच सर्व कार्यकारणी सदस्य. सामाजिक कार्यकर्ते .जेष्ठ नागरिक परिवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादा-दादी पार्कमधील ओपन जिमसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या साहित्याचे पूजन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Advertisement

 

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांनी जेष्ठ नागरिकांचे सामाजिक जीवनातील योगदान अधोरेखित केले. “तळेगावच्या विकासामध्ये अनुभवी व ज्येष्ठांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शहराचा विकास अधिक सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

 

सुरेश साखवळकर यांनी आपल्या भाषणात जेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. “गेल्या ३३ वर्षांपासून मंडळ सामाजिक सलोखा, आरोग्य, संस्कृती आणि मूल्ये जपण्याचे कार्य करत आहे. आजची युवा पिढी घडवण्यात जेष्ठांचे योगदान अमूल्य आहे, असे ते म्हणाले.

 

नगरसेवक सुदाम शेळके यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तर पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नागरिकांनी तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका व प्रशासनाला जमेल ती मदत व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. अनुभवी हात विकासकार्यात सहभागी झाल्यास तळेगावचे भवितव्य अधिक उज्वल व विकसित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page