भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा रोटरी सिटीचा महा पतंग महोत्सव… आमदार सुनिल शेळके
तळेगाव दाभाडे
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व काळोखे पाईप्स अँड प्रिकास्ट इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तळेगाव दाभाडे येथील काळोखे स्पोर्ट्स ग्राउंड वर मावळ पंचक्रोशीत पहिल्यांदाच भव्य दिव्य स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महा पतंग उत्सव २०२६ थाटामाटात संपन्न झाला असून उपक्रमाचे उदघाटक मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी मनोगताद्वारे रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत भारतीय संस्कृतीमधील सण आणि उत्सव यांचा वसा आणि वारसा पारंपारिक पद्धतीने जपण्याचं काम रोटरी सिटी करीत आहे असे गौरवोद्गार काढले व आगामी काळात पारंपारिक खेळांच्या स्पर्धांचे रोटरी सिटीने आयोजन करावे आपण त्यांच्या सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन आमदार शेळके यांनी केले. तर ७ महिन्यात तब्बल ७० उपक्रम राबवत रोटरी सिटी आदर्शवत कामगिरी करीत आहे पुढील काळात नगरपालिकेच्या माध्यमातून रोटरी सिटी बरोबर समाज हिताचे उपक्रम घेण्याचा मनोदय नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी व्यक्त केला. समाजातील विविध घटकांपर्यंत रोटरी सिटीच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना सिटीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी मागील १० वर्षाचा क्लब आढावा घेताना आगामी मेगा प्रोजेक्ट विषयी माहिती देत पूरग्रस्तांच्या व धरणग्रस्तांच्या मुला मुलींची लग्न सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रांजली पवार यांनी या अनोख्या पतंग महाउत्सवाचे कौतुक करताना रोटरी सिटीने विटी दांडू, आट्यापाट्या, लिंगोऱ्या, भोवरा, कबड्डी इत्यादी खेळांचे भविष्यात आयोजन करावे असे प्रतिपादन करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी क्लब ॲडव्हायझर हरिश्चंद्र गडसिंग, नगरसेविका शैलजाताई काळोखे, नगरसेविका ऋतुजा भगत, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी, तळेगाव पोलीस स्टेशनचे मुल्ला साहेब, सहप्रांतपाल भालचंद्र लेले, उद्योजक दादासाहेब उ-हे, सी.आर.पी.एफ.चे इन्स्पेक्टर रामदास यशवंते यांनी मनोगताद्वारे उपक्रमास शुभेच्छा दिल्या.*
आंतरराष्ट्रीय दर्जाचा महा पतंग उत्सव तळेगाव शहरात पहिल्यांदाच झाल्याने विद्यार्थी, नागरिक, महिला भगिनी, सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते २ फुटापासून ३० फुटापर्यंतच्या रंगीबेरंगी, पशुपक्षी,प्राण्यांच्या आकाराच्या अतिशय आकर्षक,रंगीबेरंगी पतंग पुणे काईट्स संस्थेच्या वतीने सादरीकरण होताना उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. श्रीकांत चेपे व सहकारी यांनी अतिसुंदर पतंग उडविण्याची प्रात्यक्षिके करताना लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासह अबाल वृद्धांनी पतंगोत्सवाचा आनंद घेतला.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले तर स्वागत समन्वयक मुकुंद तनपुरे यांनी केले सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले असून सेक्रेटरी संजय मेहता यांनी आभार मानले.*
*संस्थापक अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख विलास काळोखे,उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, सेक्रेटरी संजय मेहता, ॲडव्हायझर दिलीप पारेख,हरिचंद्र गडसिंग, नितीन शहा, मनोज ढमाले,निलेश राक्षे, विलास वाघमारे, संग्राम जगताप, संजय वाघमारे, संजय चव्हाण, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, प्रसाद बानगुडे, नवनाथ म्हसे, रामनाथ कलावडे,गणपत जाधव, आनंद रिकामे, मनोज नायडू,गोपाल नागरे, तानाजी मराठे, मुकुंद तनपुरे,मोहन खांबेटे,संजय भागवत, राजेश बारणे, शरयू देवळे, सुनंदा वाघमारे, स्वाती मुठे,वर्षा खारगे, दिपाली पाटील, मनीषा पारखे, वैशाली लगाडे,फाल्गुनी भाटिया, सोनाली पाटील इ.नी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.*






