वडाचे झाड पडून जखमी झालेल्या रुग्णाला माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा मदतीचा हात
पिंपळे गुरव :
गेल्या महिन्यात पिंपळे गुरव परिसरात वडाचे झाड पडून संजय भिसे या नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे. संजय भिसे यांची दिवाळी आनंदी व्हावी, यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पुढाकार घेत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
Advertisement
जगताप यांनी रुग्णाच्या घरी भेट देऊन विचारपूस केली आणि वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. स्थानिक नागरिकांनी या संवेदनशील भूमिकेबद्दल राजेंद्र जगताप यांचे कौतुक केले आहे.
यावेळी बंजारा समाज संस्थेचे शहराध्यक्ष संदीप राठोड, राजमाता जिजाऊ डेअरीचे उद्योजक बाळासाहेब तुकाराम देवकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ऍड. अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.






