इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई भागवत यांचा दौरा गाजतोय — महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, निवडणुकीला नवी रंगत
मावळ :

इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांनी गावभेटी व संपर्क दौऱ्याला जोरदार सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात महिलांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या गटातील निवडणूक आता रंगतदार वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. जनतेशी थेट संवाद साधत मेघाताई भागवत यांनी आपल्या विकासदृष्टी, सामाजिक कार्याचा अनुभव आणि सर्वसमावेशक विचारसरणी मांडली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेले स्पष्ट उत्तर यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.

दरम्यान, इंदोरी-वराळे गटातील जनतेतून “या वेळी मेघाताई भागवत” अशी चर्चा वाढताना दिसते आहे. त्यांच्या साधेपणामुळे, प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे आणि पक्षनिष्ठेमुळे त्या जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. मेघाताई यांचा गावोगाव वाढता जनसंपर्क पाहता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालादेखील त्यांच्या उमेदवारीवर गंभीर विचार करावा लागणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांचे नाव अग्रक्रमात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली इंदोरी-वराळे गटात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.






