महिला नेतृत्व विकास शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे :
महाशक्ती शहरस्तर संघ व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे बुधवारी (दि.9) आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरणासाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण व मेकअप सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, करसंकलन अधिकारी कल्याणी लाडे, प्रशासकीय अधिकारी सीमा कांचन, मेकअप आर्टिस्ट अबोली मांडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने झाले.
सीमा कांचन यांनी नेतृत्व विकासावर महिलांना मार्गदर्शन करत नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वास, संवादकौशल्य, सकारात्मकता यावर भर दिला. उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी महिलांनी अशा संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. दुपारच्या सत्रात अबोली मांडवकर यांनी ब्रायडल, पार्टी व साइडर मेकअप कलेची प्रात्यक्षिके मॉडेलवर करून दाखवली. कार्यक्रमाचे नियोजन विभा वाणी व संघ कार्यकारिणीने केले. सूत्रसंचालन प्रतिभा घोडके केले. दया लायगुडे यांनी आभार मानले.