आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत विबग्योर, ब्लूमिंग, इम्प्रॉस स्कूलचे संघ विजयी
तळेगाव दाभाडे :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने रविवारी (दि. 6) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या रायन ब्लू क्यूब्ज लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत विबग्योर, ब्लूमिंग, इम्प्रॉस स्कूलच्या खेळाडुंनी चकमदार खेळ करत आपापल्या गटात विजय नोंदवला.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या अॅथलेटिक एकर टर्फ ग्राऊंडवरील स्पर्धेत जिल्ह्यातील 20 शाळांमधील संघांच्या 400 फुटबॉलपटुंनी भाग घेतला. मुलामुलींच्या पाच गटनिहाय झालेल्या सामन्यात पिंपरी-चिंचवड, गहुंजे आणि तळेगाव दाभाडे येथील खेळाडुंनी वर्चस्व सिध्द् केल्याचे स्पर्धा संयोजन समितीप्रमुख तथा राष्ट्रीय फुटबॉलपटू मनोज स्वामी यांनी सांगितले. स्पर्धेतील सर्वसाधारण विजेता म्हणून ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या (गहुंजे) संघास गौरविण्यात आले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि साहेबराव बोडके यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय फुटबॉलपटू रायन स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक मनोज स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव मार्गारेट स्वामी, प्रशिक्षक विजयकुमार चिन्नया, ज्ञानेश राणा, अक्षय डोईफोडे, कृष्णा थापा आणि सुनील रोका यांनी काम पाहिले. प्राचार्या विजिला लक्ष्मी यांनी आभार मानले.
गटनिहाय विजेते प्रथम तीन क्रमांक याप्रमाणे-
अंडर-७: विबग्योर स्कूल (चिंचवड) प्रथम, ब्लूमिंग इंटरनॅशनल (गहुंजे) द्वितीय, अरायझ इंटरनॅशनल (रावेत) तृतीय.
अंडर-९: विबग्योर स्कूल विजेता, ब्लूमिंग इंटरनॅशनल व पोदार इंटरनॅशनल (तळेगाव) अनुक्रमे दुसरे व तिसरे.
अंडर-११: इम्प्रॉस इंटरनॅशनल (तळेगाव) प्रथम, विबग्योर स्कूल द्वितीय, एसएनबीपी स्कूल (पिंपरी) तृतीय.
अंडर-१५ मुली: ब्लूमिंग इंटरनॅशनल (गहुंजे) विजेता, विबग्योर आणि इम्प्रॉस स्कूल दुसरे व तिसरे.
अंडर-१५ मुले: पोदार इंटरनॅशनल (चाकण) विजेता, ऑर्किड्स इंटरनॅशनल (निगडी) दुसरे, ब्लूमिंग इंटरनॅशनल (गहुंजे) तिसरे, ऑर्किड्स बी-टीम (निगडी) चौथे.