आळंदीत आरोग्य सेवा – पर्यावरण जनजागृती रॅली
आळंदी :

इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन (आयएपीएसएम) यांच्या निर्देशा नुसार, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे अंतर्गत कम्युनिटी मेडिसिन विभागाचे वतीने ( दि. १ ) आरोग्य सेवा पर्यावरण जनजागृती विषयक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
आळंदीतील वडगाव चौक ते आरएचटीसी – आळंदी, मरकळ रोड पर्यंत आरोह, पर्यावरण विषयक संदेश देत जागरूकता रॅली झाली. यावेळी आळंदी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष सागर भोसले, आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, कालिदास तापकीर, प्रसाद कवडे आदी उपस्थित होते.
या रॅलीचा उद्देश युनायटेड फॉर ह्युमन, अॅनिमल अँड एन्व्हायर्नमेंटल वेल बीइंग या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी समाज प्रबोधन हा उद्देश होता. या रॅलीमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय इंटर्न, नर्सिंग विद्यार्थी, पॅरा मेडिकल स्टाफ, पशुवैद्यकीय डॉक्टर, आशा वर्कर्स, शालेय विद्यार्थी, ग्रामपंच सदस्य आणि सरपंच, पोलिस कॉन्स्टेबल, एनजीओ, पत्रकार आणि स्थानिक जनता यासह विविध विभागातील २०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत समाज प्रबोधन केले.






