*रोटरी एमआयडीसी पुरस्काराने सन्मानित*
तळेगाव दाभाडे :
बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी प्रोग्राम अंतर्गत केलेले विशेष कार्य तसेच प्लेइंग इलेव्हन अंतर्गत रोटरी स्मार्ट पाठशाला टीच प्रोग्राम यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीला पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीएमसीए ऑडिटोरियम हॉलमध्ये नुकतेच जिल्हा 3131 चे अध्यक्ष शितल शहा यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआय डी सी चे अध्यक्ष मिलिंद शेलार यांना ७स्टार अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
रोटरी मार्फत समाज उपयोगी कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. पुणे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये रोटरीचे मोठे योगदान आहे. मागील अडीच महिन्यात रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीच्या मार्फत शिक्षकांचा आरसीसी क्लब स्थापन करणे, ग्रामीण भागातील शाळांना अत्याधुनिक कम्प्युटर लॅब देणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर जनजागृती करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांसाठी विशेष नाट्य प्रशिक्षण देणे, स्टडी ॲपचे वाटप करणे आदी कामे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शना नुसार मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. याचा ग्रामीण भागातील साक्षरता वाढीसाठी मोठा फायदा झाल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्यातील मानाचा सेव्हन स्टार अवॉर्ड रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीला देण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार प्रकल्प प्रमुख संदीप मगर यांनी पुरस्कार स्वीकारला.यावेळी हिरामण बोत्रे, सचिन कोळवणकर उपस्थित होते या प्रोग्राम मधील को होस्टिंग संदर्भात विशेष ट्रॉफी देऊन यावेळी क्लबला सन्मानित करण्यात आले. क्लबच्या या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडी सी चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रशंसा केली.