साप्ताहिक अंबरचे सहसंपादक अतुल पवार यांची तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.
तळेगाव दाभाडे, दि. २७-साप्ताहिक अंबरचे सहसंपादक अतुल पवार यांची तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मनोहर दाभाडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाकरिता आयोजित कार्यकारिणी सभेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अतुल पवार संस्थापक सदस्य असून यापूर्वी सचिव पदही त्यांनी भूषविले आहे. मावळ ऑनलाइनचे संपादक प्रभाकर तुमकर यांची हिशोब तपासणीस म्हणून निवड करण्यात आली.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश साखवळकर, मावळते अध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव सोनबा गोपाळे, खजिनदार बी. एम. भसे, यांसह सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे, रामदास वाडेकर आदी कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.