इंद्रायणी महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
शुक्रवार दिनांक 21 जून रोजी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन प्रसन्न सकाळी उत्साहात पार पडला. विज्ञान शाखेचे प्रा. शिवाजी जगताप व श्री. किशोर शेवकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविली.
प्रा. जगताप यांनी योगाविषयी सविस्तर असे मार्गदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकांना केले .महर्षी पतंजली यांनी योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये आसन, प्राणायाम,ज्ञानसाधना यामुळे धकाधकीच्या जीवनात आपल्यामधील ताण-तणाव कमी करण्यास योग साधनेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो आहे असे जगताप सर यांनी सांगितले.
त्यांनी उभ्या स्थितीतील सूर्यनमस्कार,ताडासन,वृक्षासन, अर्धचक्रासन ,त्रिकोणासन ,तसेच बैठक स्थितीतील वज्रासन, शशकासन, अर्धउष्ट्रासन ,पश्चिमोत्तासन, वत्रासन ,पद्मासन, अर्धपद्मासन, अर्धहलासन,शलभासन सर्वांगासन ,पूर्णहलासन ,शीर्षासन, अनुलोम विलोम , भ्रामरी इत्यादी अनेक आसनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली.
याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के .मलघे सर ,बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे ,डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गुलाब शिंदे ,इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.पी.भोसले श्री.गोरख काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी योग प्राणायाम आसन केली.
याप्रसंगी प्राध्यापक शिवाजी जगताप, श्री किशोर शेवकर यांचा प्राचार्य डॉ.एस.के. मलघे ,प्राचार्य डॉ.संजय आरोटे ,उपप्राचार्य भोसले यांनी सत्कार केला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री.रामदासजी (आप्पा)काकडे साहेब कार्यवाह.श्री.चंद्रकांतजी शेटे साहेब यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रा. आर आर डोके यांनी केले. . कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका प्रतिभा गाडेकर व क्रीडा शिक्षक अश्फाक मुलाणी यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी सर्वांचे आभार सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. योगिनी हुलावळे यांनी मानले.