राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थी संस्कारक्षम होतो – प्रा. आर.आर.डोके
लोणावळा :
कला, वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे एक ऑक्टोबरला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 55 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजाराम डोके सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना प्राध्यापक डोके सर म्हणाले तुमच्यासारख्या युवकांना नवचैतन्य देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते.युवाशक्तीचा उपयोग समाजाला ,राज्याला, देशाला होण्यासाठी 24 सप्टेंबर 1969 रोजी म्हणजे महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या दिवशी योजना सुरू झाली. स्वयंसेवक म्हणून मला माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी कार्यरत राहायचे ही भावना महत्वाची असते. मैत्री, सहकार्य, त्याग काय असतो? हे कळते.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा संदेश भजन, कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात दिला. देव दगडात नसून तो माणसात आहे .म्हणून पहिल्यांदा चांगला माणूस घडवला पाहिजे. योजनेच्या माध्यमातून आपण ग्राम स्वच्छता अभियान, जलसंधारण ,पाणी आडवा पाणी जिरवा ,डोंगर उतारावर चर खोदणे,शेततळी तयार करणे ही कामे करता येतात. अशा अनेक योजना विविध उदाहरणे देऊन समजून सांगितल्या. आज महिलांवर मुलींवर लैंगिक अन्य अत्याचार होतात यावर कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. सामाजिक कार्य करन्यासाठी आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशनचे जे काम चालू आहे. त्यात एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा आहे. आज हजारो गावे पाणीदार झाली आहेत. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला अनुसरून प्राध्यापक डोके सरांनी या दोन्ही महापुरुषांना बद्दल आपले विचार व्यक्त केले. दुबई मधील बुर्ज खलिफा प्रशासनाने तीन ऑक्टोबर 2021 मध्ये बुर्ज खलिफा या इमारतीवर गांधीजींचा पुतळा उभारला त्यावेळी त्यांनी म्हटले की जगभरात हिंसा आणि आक्रमकता वाढत असताना महात्मा गांधीजींचे विचारच जगाला तारू शकतात.जगातील अनेक महान देशांचे नेते महात्मा गांधींच्या विचारांना आदर्श म्हणून आपली राजकीय वाटचाल करत आहे ही गोष्ट आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे असे मत व्यक्त केले .लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरही प्राध्यापक डोके सर यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.देशमुख सर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हटले की भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम युवा पिढीने करावं .संस्कृतिक ओळख निर्माण करावी असे म्हटले याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख वर्गीस मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक धनराज पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक साळवे सर यांनी मांडले.