इंद्रायणी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.उपप्राचार्य प्राध्यापक भोसले सर, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य भोसले सर यांनी केले. महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा मार्गाने भारताचा स्वातंत्र्य लढा उभारला. जनतेला न्याय मिळावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रह केले.लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शेतकऱ्यांविषयी व सैनिकांविषयीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते प्राध्यापक आर.आर.डोके सर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याची, विचारांची सविस्तर मांडणी केली. भारतीय स्वातंत्र लढ्यात ज्या ज्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्या नंतरही ज्यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केलं त्यांच्या विचारांचा,त्यागाचा, संघर्षाचा ,क्रांतीचा ज्वलंत इतिहास आपण त्यांच्या जयंत्या साजरा करून जतन करण्याचे काम करतो. लोकसहभागातून ग्रामीण विकास होतो गावातील लोकांचे एकमेकांना सहकार्य असेल तर निश्चितपणे खेड्यांचा विकास होऊन गावाचे उत्पन्न वाढेल. नवा माणूस नवे राष्ट्र घडविण्याचा आशावादी दृष्टिकोन गांधीजींचा होता.जोपर्यंत गाव स्वावलंबी होत नाही,आत्मनिर्भर बनत नाही तोपर्यंत राष्ट्राच्या स्वातंत्र्याला अर्थ नाही. ग्रामीण विकासासाठी गावातील बलुतेदारी, कारागिरांचे उद्योग हस्तकला,कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देऊन गावातील गरजा गावातच भागविल्या जाव्यात असे गांधीजींचे मत होते.महात्मा गांधींच्या विचारांवर शासनाने एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हाती घेतला. त्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सडक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, संसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना,महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना म्हणून आजही असे वाटते भारतातील ग्रामीण विकास महात्मा गांधींच्या विचारानुसार घडत आहे.भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे विचार मांडत असताना प्राध्यापक डोके सरांनी म्हटले की शास्त्रीजी बनारस विश्व हिंदू विद्यालयात शिक्षण घेत असताना तेथे गांधीजींच्या भाषणाच्या प्रभाव शास्त्रीजीवर पडला त्याकाळी गरीब घरातून आलेल्या स्वतंत्र सैनिकांना सोसायट्यामार्फत घरखर्चसाठी पन्नास रुपये मिळत असे. शास्त्रीजी जेव्हा स्वातंत्र्यलढ्या च्या संग्रामात होते. तेव्हा माझ्या परिवाराला घरासाठी 40 रुपये लागतात. सोसायटीला पत्र पाठवून उरलेले पैसे पत्नीकडून घेऊन समाजासाठी खर्च करावे म्हणून शास्त्रीजींची उंची कमी परंतु कीर्ती महान होती. शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानंतर ते जेव्हा निघाले तेव्हा पत्नीने सांगितले आपण नवीन धोतर, कुर्ता, गांधी टोपी घ्यावी यावर शास्त्रीजी म्हणाले माझ्या देशातील गरीब शेतकरी मळके, फाटके कपडे घालतो. देशाची जनता गरिबी जगत असताना मी मात्र चांगली कपडे घालणे शोभते का? देशाचे रक्षण जवान करतील व पोषण किसान करतील म्हणून “जय जवान जय किसान”हा भारतीय विजयाचा व एकात्मतेचा नारा शास्त्रीजींनी दिला अणुचाचणी,हरितक्रांती श्वेतक्रांती ,महान अर्थशास्त्री म्हणून एक वेगळी ओळख होती. आज आपण सर्वजण महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर शपथ घेऊया की सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुकरण करून स्वच्छ,समृद्ध दयाळू, मजबूत आणि सशक्त भारत देश घडूया व देशाच्या कल्याणासाठी ,प्रगतीसाठी नेहमीच समर्पित राहूया. व त्यांच्या स्वप्नातील भारत सुजलाम सुफलाम करूया.
या कार्यक्रम प्रसंगी उप प्राचार्य एस.पी.भोसले, प्राचार्य गुलाब शिंदे,श्री. गोरखजी काकडे, प्रा.के. डी.जाधव, प्रा. एस.आर.जगताप,प्रा. ए.एम. जगताप, प्रा. केदारी मॅडम, प्रा. योगेश घोडके,श्री.नामदेव ढोरे, श्री,संभाजी हेंद्रे व सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.आर. जगताप सर यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय.श्री.रामदासजी काकडे साहेब,कार्यवाह माननीय. श्री.चंद्रकांतजी शेटे साहेब प्राचार्य.डॉ.एस.के.मलघे सर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.