डॉ. सौ.मृणालिनी सचिन नाईक यांचे अल्पशः आजाराने निधन
तळेगाव दाभाडे :
माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नाईक यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. मृणालिनी नाईक यांचे दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्या ५० वर्षाच्या होत्या. त्या या संस्थेत क्ष-किरण विभागात “कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट” म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती व मुलगी आहे.
डॉ. सौ. मृणालिनी नाईक यांच्या आत्म्यास सद्गती मिळो अशी प्रार्थना संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, प्राचार्या डॉ. दीपा नायर, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केली व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.






